लोहमार्ग पोलिसांचा बुरखा फाटला

12/01/2012 17:33
सोलापूर। दि़ 4 (प्रतिनिधी)
लाचप्रकरणात पोलिसांबरोबर पोलीस निरीक्षकास अटक झाल्याने लोहमार्ग पोलिसांचा बुरखा फाटला आहे.
चोरीच्या तपास प्रकरणात ताब्यात घेतलेली मोटरसायकल, मोबाईल हँडसेट, पैसे परत करण्यासाठी लोहमार्ग पोलीस ठाण्यातील पो. कॉ. कोकणी याने तक्रारदारास 50 हजार मागितले. तडजोडीनंतर 25 हजार देण्याचे ठरले. त्यातील 15 हजार हजार स्वीकारताना रविवारी कोकणी यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यानंतर तपासादरम्यान कोकणी याने ही लाच पोलीस निरीक्षक विनायक खंदारे यांच्या सांगण्यावरून घेतल्याची कबुली दिली. यावरून पोलिसांनी मंगळवारी रात्री पोलीस ठाण्यात जाऊन खंदारे याला अटक केली. लोहमार्ग पोलीस ठाणे गेल्या काही दिवसांपासून वादातीत ठरले आहे. ऑक्टोबर महिन्यात रेल्वेस्टेशनवरील अग्रवाल टी कॉर्नरची तोडफोड करण्यात आली. याबाबत तक्रार देऊनसुद्धा लोहमार्ग पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर डिसेंबरमध्ये नागरकोयल एक्स्प्रेसवर दरोडय़ाचा प्रकार घडला. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी वेळेवर फिर्याद न घेतल्यामुळे रेल्वे रोको आंदोलन केले होते. त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात इंद्रायणी एक्स्प्रेसमधून उतरत असणा:या वृद्धेच्या गळय़ातील मंगळसूत्र चोरटय़ाने लंपास करण्याचा प्रयत्न केला. लोकांनी पकडून चोरटय़ास लोहमार्ग पोलिसांच्या हवाली केले. पण पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. यामुळे लोकांमध्ये असंतोष आहे.
पोलीस निरीक्षक खंदारे व पो. कॉ. कोकणी यांच्या अटकेमुळे लोहमार्ग पोलिसात खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्याचा पदभार फौजदार मोहनसिंग चव्हाण यांच्याकडे देण्यात आला असून उपअधीक्षक काझी हेही सोलापुरात दाखल झाले आहेत. पो. कॉ. कोकणी याची कारकीर्द वादग्रस्त असल्याची माहिती मिळाली. यापूर्वीही तो एका प्रकरणात निलंबित होता. महत्त्वाची नियुक्ती देऊ नये असा शेरा असतानाही वरिष्ठांची मर्जी संपादून विविध जबाबदा:या पार पाडताना दिसून येत होता. वाहतूक शाखेची जबाबदारी असताना वरिष्ठांच्या खास मर्जीवरून त्याच्याकडे गुन्हे तपासाची कामे दिली जात होती, अशी माहिती मिळाली आहे.

 


solapur pune pravasi sangatana