विजापूर-मुंबई गाडी रोज सोडा

12/03/2012 15:44
प्रवाशांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांना रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. येत्या अर्थसंकल्पात सोलापूर विभागात मोहोळ-भिगवण दुहेरीकरणाच्या कामाला गती मिळावी, इलेक्‍ट्रिेफिकेशन कामांना प्रारंभ व्हावा, विजापूर-मुंबई गाडी रोज सोडावी, अशी अपेक्षा प्रवासी संघटना व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

मासिक पासची मागणी
प्रवाशांची मागणी लक्षात घेता सोलापूर ते पुणे या दरम्यान मासिक पास सुविधा मिळणे आवश्‍यक असल्याची प्रतिक्रिया सोलापुर पुणे प्रवासी संघटना,सचिव महावीर शहा  यांनी दिली. सोलापूर ते पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, या प्रवाशांना पासची सुविधा मिळत नाही. विशिष्ट किलोमीटरपर्यंतच मासिक पास मिळतो, असे केवळ तांत्रिक कारण दाखवून रेल्वे प्रशासन प्रवाशांची अडवणूक करते. सध्या प्रवाशांना सोलापूर ते कुर्डुवाडी, कुर्डुवाडी ते दौंड व दौंड ते पुणे असे पास काढावे लागतात.

पंढरपूरपर्यंत गाडी न्या
विजापूर मुंबई फास्ट पॅसेंजर आठवड्यातून सध्या चार दिवस धावते, ती दैनंदिन करावी, यशवंतपूर सोलापूर ही गाडी स्थानकात जागा नसल्याने बागलकोटकडे रवाना होते त्याऐवजी ती पंढरपूरपर्यंत नेण्यात यावी. सोलापूर पुणे हुतात्मा एक्‍स्प्रेसची वेळ सकाळी सातची करावी. या गाडीला पंढरपूर, कुर्डुवाडी, बार्शीच्या प्रवाशांसाठी एक अनारक्षित डबा जोडावा. मासिक पास धारकांना आरक्षित डब्यातून प्रवासाची मुभा मिळावी, अशा मागण्या पुढे येत आहेत.

थांबे मिळावेत
अक्कलकोट रोड येथे कोइमतूर, हुसेनसागर व बसव एक्‍स्प्रेसला थांबा मिळावा, हैदराबाद पुणे एक्‍स्प्रेस बार्शी येथे थांबविण्यात यावी. विजापूर ते मुंबई गाडीला पारेगावला थांबा मिळावा, सर्व साप्ताहिक गाड्यांना कुर्डुवाडीत नियमित थांबा मिळावा, हुतात्मा एक्‍स्प्रेस गाडीस मोहोळ व जेऊर स्थानकावर थांबे द्यावेत, अशा मागण्या सोलापूर जिल्हा प्रवासी संघटनेने केल्या आहेत.

नव्या गाड्या हव्यात
 "इंद्रायणी'ला मिळणारा प्रतिसाद पाहता पुणे ते सोलापूर ही सकाळी नवी इंटरसिटी सुरू करण्याची मागणी पूर्वीपासून आहे.

solapur pune pravasi sangatana