विठ्ठलाची देणगी द्या क्रेडिट, डेबिट कार्डद्वारेमंदिर समिती प्रशासनाची नवी सुविधा

22/07/2011 15:47

पंढरपूर। दि. 19 (प्रतिनिधी) 
श्री विठ्ठल-रुक्मिणीला देणगी देण्यासाठी आता क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करता येणार आहे. मंदिर समिती प्रशासनाच्या पुढाकाराने ही सुविधा उपलब्ध होत आहे. कार्ड स्व्ॉप करण्यासाठी मंदिर समितीच्या कार्यालयात दोन पॉस टर्मिनल (पॉइंट ऑफ) मशीन लावण्यात येत आहेत.

गोरगरीब भक्तांचा देव म्हणून परिचित असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीला दरवर्षी लाखो रुपयांची देणगी मिळत आहे. मंदिराच्या तिजोरीत दिवसेंदिवस चांगली भर पडत आहे. मंदिर समितीच्या कार्यालयात एकादशीला देणगी देण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते. आता देणगी देण्यासाठी सोबत पैसे आणण्याची गरज नाही. मंदिर समिती प्रशासनाने यासाठी आता कार्ड स्व्ॉपची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

कार्यकारी अधिकारी दीपक चव्हाण म्हणाले की, गेल्या वर्षी कार्तिकी एकादशीला मंदिर समितीच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. वेबसाईटवरून श्री विठ्ठलाचे लाइव्ह दर्शन होते. आता ऑनलाईन देणगीसाठी काम सुरू करण्यात आले आहे. ऑनलाईन देणगीसाठी अर्थ आणि गृह विभागाचे सर्व निकष पूर्ण करावे लागतात. हे काम अंतिम टप्प्यात आहे. यादरम्यान कार्ड स्व्ॉपिंगद्वारे देणगी स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत दोन स्व्ॉप टर्मिनल मशीन उपलब्ध होत आहेत. ही मशीन लवकरच मंदिर समितीच्या कार्यालयात लावण्यात येईल. कार्ड स्व्ॉप झाल्यानंतर भाविकांना समितीच्या वतीने देणगी पावती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. आता बहुतांश ठिकाणी खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचा वापर होऊ लागला आहे. काही बँकांनी दिलेल्या एटीएम कार्डवर डेबिट कार्डची सुविधा उपलब्ध आहे. दूरवरून येणा:या भाविकांना सोबत पैसे घेऊन फिरणे सुरक्षित वाटत नाही. आता त्यांना या डेबिट, क्रेडिट कार्डच्या आधारे लाडक्या विठुरायाला देणगी देणे शक्य होणार आहे


solapur pune pravasi sangatana