विलंबामुळे प्रकल्प खर्च वाढण्याचा धोका

01/03/2012 17:11
प्रस्तावित प्रकल्पानुसार दौंड ते गुलबर्गा या 224.9 किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाचे दुहेरीकरण आणि पुणे- दौंड- गुंटकल या 664 किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाच्या विद्युतीकरणासाठी 1437.79 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे विकास निगम लिमिटेड आशियाई विकास बॅंकेकडून कर्ज घेणार आहे. या प्रकल्पात बॅंक 70 टक्‍के, तर रेल्वे मंत्रालय 30 टक्‍के रक्‍कम गुंतविणार आहे. परंतु नियोजित वेळापत्रकानुसार प्रकल्पाचे काम सुरू न झाल्याने प्रकल्प खर्च वाढण्याचा धोका आहे.

solapur pune pravasi sangatana