शहाडनजीक एक्स्प्रेसच्या धडकेत माय-लेकासह तीन ठार

10/05/2011 11:24

कल्याण, ७ मे
शहाड रेल्वे स्टेशनजवळ आज दुपारी गोरखपूर एक्स्प्रेसखाली आई-मुलासह एक अनोळखी व्यक्ती मरण पावली.
सोमय्या इम्रान शेख (२२), अबुजर इम्रान शेख (३) या माय-लेकासह एका अनोळखी व्यक्तीचा मृतांमध्ये समावेश आहे. सोमय्या आपल्या मुलासह शहाड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेमार्ग ओलांडत होती. मुंबईकडून गोरखपूर एक्स्प्रेस येत असल्याचे तेथील वळण मार्गामुळे सोमय्याच्या लक्षात आले नाही. या माय-लेकांना वाचविण्यासाठी एक व्यक्ती पुढे सरसावली, पण काही क्षणात तिघांना गाडीने उडविले. या घटनेने एकच खळबळ उडाली. बघ्यांनी तुडुंब गर्दी केली. या भागात प्रवाशांच्या सोयीचा पादचारी पूल नसल्याने हा अपघात झाला, असे बोलले जाते. या दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यासाठी संतप्त प्रवाशांनी शहाडचे स्टेशन मास्तर दलबीर सिंग यांना घेराव घातला


solapur pune pravasi sangatana