शाळा बंद करण्याचा निर्णय रेल्वेकडून रद्द

09/08/2011 16:04

मनमाड, ७ ऑगस्ट
येथील मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय अखेर रेल्वे प्रशासनाने मागे घेतला आहे. रेल्वेने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यावर सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने काही दिवसांपासून येथे साखळी उपोषण सुरू केले होते. रेल्वे विभाग पंचवटी कॉलनीत ही शाळा आहे. रेल्वे प्रशासनाने प्रारंभी पहिलीचा वर्ग बंद केला. त्यानंतर दुसरीचा वर्ग बंद केला. सीआरएमएसच्या ओपनलाइन व कारखाना या दोन्ही शाखांनी वर्षांपासून सतत संघर्ष करून त्यास विरोध केला. धरणे, मोर्चा काढला. परंतु प्रशासन दाद देत नसल्याने २६ जुलैपासून साखळी उपोषण सुरू केले होते. अध्यक्ष व सचिवांनी आमरण उपोषणाची नोटीस प्रशासनाला दिल्यावर सीआरएमएसच्या झोनल अध्यक्षांनी हा विषय मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांपुढे मांडला. अखेर प्रशासनाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला
.


solapur pune pravasi sangatana