सीएसटीत रेल्वेची हेरिटेज गॅलरी

05/11/2011 10:46

ठाणे। दि. ३ (प्रतिनिधी)
जगात हेरिटेज दर्जा प्राप्त झालेल्या सीएसटी रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेच्याच दुर्मीळ वस्तूंचा संग्रह करण्यात आला असून त्या सर्व वस्तू ग्रॅण्ड स्टेअरकेसच्या परिसरात आकर्षक पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. अभ्यासकांसह पर्यटकांना, प्रवाशांना या संग्रहालयाचा लाभ घेता येणार आहे. परंतु, त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष रचनेतून यावे लागणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
सर्वसामान्यांच्या माहितीसाठीच हे दुर्मीळ वस्तूंचे संग्रहालय उभारण्यात आल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले आहे. या वस्तुसंग्रहालयात भारतीय रेल्वेचे १८५७ चे घड्याळ, स्टीम इंजीनसह रेल्वे बोगींचे जी५ मॉडेल, जबलपूर लोकोशेडचे स्टीम इंजीन डब्ल्यूपी-७0१९ हे मॉडेल, बॉल आणि टोकन मॉडेल, अँनेरॉईड बॅरोमीटर, राजा-राणी बेलगेन्स जेव्हा भारत भेटीवर आले होते तेव्हाचे चांदीचे लिखाणाचे पॅड, थेडोलाईट, पितळेची बेल- जी माथेरान रेल्वेसाठी १८६६ मध्ये वापरण्यात आली होती. १८५७ ची सक्यरुलर स्लाईड नियमावली, १९४४ ची फ्लॅट स्लाईड नियमावली, जीआयपी आणि भारतीय रेल्वेचे जुने लोगो, १९३८ मधील तृतीय श्रेणीचे तिकीट, तलानी-मलकापूर तृतीय श्रेणीचे कार्ड (सिझन) तिकीट, १९३२ चे अँक्स्लोमीटर आणि फायर बेल अशा विविध वस्तूंचे संग्रहालय उभारण्यात आले आहे. इतिहास, भारतीय रेल्वेच्या इतिहासाचा अभ्यास करणार्‍यांना व शाळेच्या विद्यार्थ्यांना निश्‍चितच लाभ होईल.


solapur pune pravasi sangatana