सोलापुरात पत्रकारांचे धरणे

19/05/2011 17:22

पत्रकारांवर सूडबुद्धीपोटी केलेल्या कारवाईचा निषेध
दै. सुराज्यचे वृत्तसंपादक राजकुमार नरुटे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करून सूड भावनेतून कारवाई केल्याच्या निषेधार्थ पत्रकार संरक्षण कृती समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन केले. पोलिसांचा निषेध करून पोलीस आयुक्त हिम्मतराव देशभ्रतार यांच्यावर कारवाी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाला समाजातील विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे.

विजापूर नाका पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास रामगुडे यांना लाच देण्याचा प्रयत्न करून सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली नरुटे यांच्यासह तिघांवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती. आयुक्त देशभ्रतार यांच्या पोलीस खात्याने कोठडीत असताना नरुटे यांचा शारीरिक व मानसिक छळ करून पोलीस खात्याविरोधातील बातम्यांचा सोत (सोर्स) जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या या निषेधार्ह व वृत्तपत्रस्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या कृतीविरोधात हे आंदोलन करण्यात आले.

आ. विजयकुमार देशमुख, आ. प्रणीती शिंदे, आ. दिलीप माने यांच्यासह राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाईं, शिवसेना, भाविसे, महाराष्ट्र सेना, सावरकर विचार मंच, वृत्तपत्र विक्रेते संघटना, दलित सेना, बोधिसत्त्व युवक मंडळ आदी राजकीय पक्ष व संघटनांच्या नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला
.


solapur pune pravasi sangatana