सोलापूरकर पुन्हा गारठले

15/01/2012 11:38
सोलापूर - थेनच्या चक्रीवादळानंतर थोडीशी विश्रांती घेतलेली थंडी पुन्हा वाढत असून, त्यामुळे सोलापूरकर गारठून जात आहेत. डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातच तापमान 12 अंश सेल्सिअसवर आले होते. त्यानंतर "थेन' नावाच्या चक्रीवादळाने तमिळनाडूत धुमाकूळ घातला. त्याचा परिणाम होऊन थंडी काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून तापमानाचा आलेख पुन्हा खाली येत आहे. आज सोलापुरात 12.2 अंश सेल्सिअस तापमान होते. संक्रांतीनंतर थंडीच्या प्रमाणात आणखी वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

solapur pune pravasi sangatana