सोलापूरच्या तापमानात वाढ

21/04/2011 15:25

सोलापूर - शहर परिसरात तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. आज 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान खात्याने केली आहे. शहर परिसरात दोन एप्रिलपासून तापमानात वाढ होण्यास सुरवात झाली. दोन ते अकरा एप्रिल दरम्यान 36 ते 39 अंशादरम्यान तापमानाची नोंद झाली. बारा एप्रिल रोजी 40.1 अंश सेल्सिअसची नोंद झाली. 13 एप्रिल रोजी 6.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे शहरातील तापमानात घट झाली. त्या दिवशी 38.7 सेल्सिअसची नोंद झाली. त्यानंतर तापमानात चढ-उतार सुरू होते. परत तापमान वाढण्यास सुरवात झाली. 17 एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दुसऱ्या दिवशी म्हणजे काल दोन अंशाखाली पारा उतरला. त्या दिवशी 38.5 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज पुन्हा तापमानात वाढ झाली आहे.


solapur pune pravasi sangatana