सोलापूरहून पुण्यासाठी आणखी एक रेल्वे

18/03/2010 11:26

  सोलापूर -सोलापूरहून पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्याहून सोलापूरला येणाऱ्या प्रवाशांसाठी उद्या शनिवारपासून आणखी एक रेल्वे गाडी उपलब्ध होत आहे. रेल्वे प्रशासनाने मुंबई-पुणे इंद्रायणी एक्‍स्प्रेस सोलापूर पर्यंत सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला सुट्टीच्या कालावधीसाठी सुरु होणारी ही गाडी प्रवाशांच्या चांगला प्रतिसाद मिळाल्यास सलग पुढे सुरु राहण्याची शक्‍यता आहे. सोलापूरहून पुण्याला जाण्यासाठी व येण्यासाठी हुतात्मा एक्‍स्प्रेस हे अतिशय सोयीची रेल्वे गाडी आहे मात्र सकाळच्या वेळी पुण्याहून सोलापूरला येण्यासाठी आणि दुपारच्या वेळेस सोलापूर पुण्याला जाण्यासाठी आणखी एका थेट गाडीची सोय व्हावी अशी प्रवाशांची आग्रही मागणी होती. त्याला रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. इंद्रायणी एक्‍स्प्रेस मुंबईतून पुण्याकडे पहाटे ५.३५ वाजता रवाने होते. ती पुण्यात सकाळी ९ ला पोचते. हीच गाडी सकाळी ९.३० ला पुण्यातून सुटून दुपारी दीडला सोलापूरला पोचेल. त्यानंतर लगेच दुपारी २ वाजता सोलापूरहून ही गाडी पुण्याला रवाना होईल. पुण्यात ती सायंकाळी ६ ला पोचेल. तीच गाडी पुढे सायंकाळी ६.३० ला पुण्यातून सुटून रात्री सव्वा दहाला मुंबईला पोचेल.

या नव्या गाडीमुळे सोलापूरच्या प्रवाशांना पुण्याबरोबरच मुंबईपर्यंत जाण्यासाठी आणखी एक थेट रेल्वे गाडी उपलब्ध झाली आहे.

 


solapur pune pravasi sangatana