सोलापूर विभागातून सात नवीन गाड्यांचा प्रस्ताव

10/11/2012 13:05
सोलापूर - मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने नव्याने सात गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविला आहे. कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला विविध मार्गांवरून बारा गाड्यांचा प्रस्ताव असल्याची माहिती वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी दिली. आगामी आर्थिक वर्षासाठी सोलापूर ते नागपूर (रोज), सोलापूर ते हैदराबाद, सोलापूर ते कोल्हापूर (रोज), लातूर ते तिरुपती (रोज), नांदेड ते पंढरपूर ते कोल्हापूर (आठवड्यातून तीन वेळा), सोलापूर ते जयपूर व्हाया शिर्डी (साप्ताहिक) आणि सोलापूर ते गोवा (आठवड्यातून तीन दिवस) या नव्या गाड्या प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

solapur pune pravasi sangatana