सोलापूर 43.2 तापमान पुन्हा वाढले

19/05/2012 10:25
सोलापूर। दि. 19 (प्रतिनिधी)
आज (शनिवारी) उन्हाचा पारा 43.2 अंश सेल्सिअसर्पयत पोहोचल्यामुळे दुपारच्या वेळी शहरातील रस्ते निमुनष्य झाले होते. हंगामातील सर्वाधिक तापमानाची आज नोंद झाली. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने अबालवृध्द अस्वस्थ होते.
यंदाच्या हंगामात काल शुक्रवार, दि. 18 मे रोजी 42.3 अंशाची पातळी गाठली होती व हंगामातील सर्वोच्च तापमान नोंदले होते. त्या तुलनेत आज 0.9 अंशाने शनिवारी पारा चढला.
सकाळपासूनच तापमानातवाढ होण्यास सुरुवात झाली. दुपारी 12 नंतर उन्हाचे चटके बसू लागल्याने रस्ते निर्मुनष्य होत होते. कडक उन्हामुळे लोकांनी बाहेर फिरणेही टाळले. कामानिमित्ताने बाहेर पडणा:यांनी काळा गॉगल, पांढरा रुमाल बांधूनच फिरणे पसंद केले. सायंकाळर्पयत उन्हाचे चटके जाणवतच होते. सायंकाळनंतरही उन्हाची धग होती.

solapur pune pravasi sangatana