२०११ मध्ये डोंबिवलीत रेल्वे अपघातात १६० जण ठार

12/01/2012 17:18

मुंबई, दि. ११ - देशातील दुस-या क्रमांकाचे सुशिक्षितांचे शहर म्हणून मान मिळालेल्या डोंबिवली शहरात गेल्या वर्षभरात रेल्वे अपघातात १६० जण ठार झाले आहेत. रेल्वे अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवलीत २०११ या वर्षात रेल्वे अपघातात १६० जण मृत्यूमुखी पडले असून १७३ जण जखमी झाले आहेत.

गेल्या पाच वर्षांत म्हणजे २००६ सालापासून डोंबिवलीत रेल्वे रूळ पार करताना एकूण ९६६ जण मरण पावल्याची माहिती डोंबिवली रेल्वे पोलिस स्टेशनमधील अधिकारी शिवाजी बागूल यांनी दिली.

२००२ ते २०११ या काळात मध्य व पश्चिम रेल्वेवर झालेल्या अपघातात आत्तापर्यंत ३६,१५२ प्रवासी मरण पावले असून ३६,६८८ प्रवासी जखमी झाले आहेत.

माहिती अधिकाराचे अधिकारी चेतन कोठारी यांनी शासकीय रेल्वे पोलिसांकडून मिळवलेल्या अहवालातून वरील माहिती मिळाली आहे. या अहवालानुसार रेल्वे रूळ क्रॉस केल्यामुळे आणि चालत्या गाडीतून पडल्यामुळे दरवर्षी सुमारे ३,५०० नागरिक मृत्यूमुखी पडतात.


solapur pune pravasi sangatana