कोल्हापूर-हैदराबाद रेल्वे एक जुलैपासून

07/03/2011 15:02

कोल्हापूर - कोल्हापूरहून हैदराबादला जाणारी रेल्वे एक जुलैपासून सुरू होणार आहे. आठवड्यातून दोन वेळा ही रेल्वे धावणार असून सकाळी साडेसातला ती हैदराबादकडे रवाना होणार आहे. रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी या रेल्वेची घोषणा केली होती.

कोल्हापूर, मिरज, पंढरपूर, कुर्डूवाडी, सोलापूर या मार्गावरून ही रेल्वे धावणार असून पंढरपूर रेल्वेमार्ग ब्रॉडगेज केल्याने ही रेल्वे सुरू होणार आहे. सोलापूर, हैदराबाद या शहरांशी कोल्हापूर जोडले जाणार आहे. रेल्वे येथील राजर्षी शाहू टर्मिनसवरून दर बुधवारी व रविवारी सकाळी साडेसात वाजता सुटेल. या रेल्वेमुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचीही सोय होणार आहे. सोळा डब्यांची ही रेल्वे हैदराबादहून मंगळवारी व शनिवारी सुटेल. ती रात्री दहा पन्नासला येथे पोहोचेल. या फेरीमुळे मिरज, सोलापूर येथे नोकरी करणाऱ्यांनाही सोयीचे ठरणार आहे.

पासधारक व इतर प्रवाशांना ही गाडी उत्तम आहे, असे मत सोलापुर पुणे प्रवासी संघटनाचे सचिव महावीर शहा कुर्डुवाडी यांनी व्यक्त केले.


solapur pune pravasi sangatana