चेंडूसारखा उडालेला मुलगा चाकाखाली दबून ठार

20/06/2011 11:48

मंद्रुप। दि. 19 (वार्ताहर)
ट्रॅक्टरच्या चाकात हवा भरताना हवेचे प्रमाण जास्त झाल्याने हवेबरोबरच डिस्कसह मुलगा 20 फूट उंच उडाला आणि डिस्कखाली चिरडून तो जागीच मरण पावला. हा विचित्र अपघात रविवारी दुपारी 12 वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज (मं़) येथे घडला. निंगप्पा शरणप्पा ग्वाडय़ाळ (वय 16) असे त्याचे नाव आह़े

औज येथील निंगप्पा ग्वाडय़ाळ हा दुपारी बाराच्या सुमारास ट्रॅक्टरचे चाक पंर काढून झाल्यानंतर चाकात हवा भरत होता. त्यात प्रमाणापेक्षा जास्त हवा भरली गेली़ त्यामुळे हवेच्या दाबाने चाकातील डिस्क आणि त्यावर उभा निंगप्पा 20 फूट हवेत चेंडूसारखे उडाल़े खाली पडल्यावर त्याच्या डोक्यात डिस्क पडल्याने गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला़ निंगप्पाला हवा भरण्याचे तंत्र माहीत नव्हते, तरीही अंकुश वगरे, भानुदास चंद्रकांत वाघमारे हे हवा भरण्यास सांगून निवांत बसले होत़े त्यामुळे निंगप्पाच्या वडिलाने अंकुश वगरे व भानुदास वाघमारे यांच्याविरोधात मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आह़े अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पारधी करीत आहेत़ निंगप्पा हा मूळचा तडवळ (ता़ अक्कलकोट) येथील आह़े पोट भरण्यासाठी औजला येऊन स्थायिक झाला होता.


solapur pune pravasi sangatana