महिला प्रवाशांना "महिला वाहिनी'चा आधार

22/07/2011 15:32

 

मुंबई - लोकल व मेल एक्‍सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेने स्थापन केलेल्या "महिला वाहिनी' पथकाच्या धडक कामगिरीमुळे महिलांचा प्रवास सुखकर झाला आहे, असा दावा मध्य रेल्वेच्यावतीने करण्यात आला आहे.

महिलांना प्रवासादरम्यान होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांच्या संरक्षणासाठी मध्य रेल्वेने "रेल्वे सुरक्षा दला'च्या (आरपीएफ) 112 महिला पोलिसांचे पथक गेल्या महिन्यात स्थापन केले. सीएसटी, भायखळा, दादर, वडाळा रोड, कुर्ला, ठाणे, मानखुर्द, कल्याण डोंबिवली, तुर्भे, पनवेल, खारघर, वाशी, बेलापूर रेल्वे स्थानकांवर ही पथके तैनात करण्यात आली आहेत. सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत दोन शिफ्ट मध्ये ही पथके महिलांच्या तक्रारी सोडविण्याचे काम करतात. महिला विशेष लोकल मध्ये गस्त घालणे, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे, महिला विशेष लोकलमधून प्रवास करणारे पुरुष प्रवाशांवर कारवाई हे पथक करीत आहे. 144 अनधिकृत फेरीवाले, महिलांच्या डब्यातून प्रवास करणारे 162 पुरुष प्रवासी, महिलांसाठी आरक्षित असणाऱ्या डब्यातून प्रवास करणारे 155 पुरुष प्रवासी, 145 उपदव्याप करून त्रास देणाऱ्यांची गठडी या पथकाने वळली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्यांतील प्रवास सुरक्षित झाल्याचे मध्य रेल्वेचे म्हणणे आहे


solapur pune pravasi sangatana