रेल्वे प्रशासनाची मोहीम

19/05/2011 17:27

पुणे : एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी फुटओव्हर ब्रिजचा वापर करण्याऐवजी रेल्वेलाइनचा वापर करणे, रेल्वे लाइनवरून चालणे, धावती रेल्वेगाडी पकडणे आदी उपक्रम करणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाईची मोहीम रेल्वे प्रशासनाने हाती घेतली आहे. रेल्वेने एक जानेवारी ते एप्रिल अखेरपर्यंत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एक हजार २१९ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून तीन लाख १५ हजार ८१० रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यापैकी दंड न भरणाऱ्या दोन जणांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. रेल्वने हाती घेतलेली मोहीम नजीकच्या काळात तीव्र करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी वाय. के. सिंह यांनी सांगितले.

गेल्या वषीर् जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत रेल्वे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच हजार ३२५ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून तीन लाख १५ हजार ८१० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, त्यामध्ये दंड न भरणाऱ्या दोघा जणांना तुरुंगाची हवा खावी लागली.

रेल्वेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षेची जबाबदारी रेल्वे प्रशासनावर असते. गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या प्रवासी संख्येत वाढ झाली असतानाच रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. रेल्वे प्रवाशांना शिस्त लावण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाईची मोहीम रेल्वेने सुरू केली आहे.


solapur pune pravasi sangatana