रेल्वे रोखणार पार्किंगमधील लबाडी

19/05/2011 17:19

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा आदेश

पार्किंगच्या नावाखाली प्रवाशांची लुबाडणूक होत असेल तर ती थांबवा. ठेकेदारावर वचक ठेवा. त्याच्याविरोधात तक्रारी आल्यास तातडीने दखल घेऊन कारवाई करा, अशा शब्दांत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक कुलभूषण यांनी मंगळवारी पार्किंग व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले. तसेच, रेल्वे स्टेशनच्या आवारात दुचाकी आणि चारचाकींसाठी स्वतंत्र गेट सुरू करण्याची सूचना त्यांनी केली.

रेल्वे-एसटी स्थानकांबरोबरच सरकारी कार्यालयांमधील पार्किंगच्या समस्येवर प्रकाश टाकणारी मालिका 'मटा'मधून प्रसिद्ध करण्यात आली होती. वास्तविक, सरकारी जागांवरील पार्किंग मोफतच हवे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी ठेकेदारांची नियुक्ती करून नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा दराने पार्किंगच्या नावाखाली वसुली केली जात आहे. त्यामध्ये पुणे स्टेशनचा अपवाद नाही. त्याचप्रमाणे शिवाजीनगर रेल्वे स्टेशनच्या परिसरातली पार्किंगच्या समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे.

या पार्श्वभूमीवर कुलभूषण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्टेशनला भेट देऊन पार्किंगच्या सुविधांची पाहणी केली. प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असताना स्टेशनमध्ये पुरेशी पार्किंग व्यवस्था असली पाहिजे. दुचाकी आणि चारचाकींसाठी स्वतंत्र पार्किंग करून त्यांचे मार्ग वेगळे करावेत. त्यामुळे गोंधळ होणार नाही. ठेकेदाराला तशा सूचना देऊन पाकिर्ंगमध्ये तातडीने सुधारणा करा. पावसाळ्याच्या तोंडावर स्वच्छतेच्या दृष्टीने कामे सुरू करून स्टेशन आणि आवारात स्वच्छता राखा, असे आदेश त्यांनी बजावले.

सामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी सुरू केलेल्या 'जनता खाना' चा दर्जा राखून ही योजना जास्तीत-जास्त प्रवाशांपर्यंत पोहोचली पाहिजे, अशा विविध सूचना त्यांनी दिल्या. रेल्वेमधील सुविधा आधिक दजेर्दार असायला हवेत. स्टेशनच्या परिसरात विशेषत: महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायमस्वरुपी उपाययोजना केल्या पाहिजेत. आरक्षण खिडक्यांसमोरील गदीर् टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक विशाल अगरवाल यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते
.


solapur pune pravasi sangatana