शहरात रिमङिाम पाऊस

27/08/2011 12:00

सोलापूर । दि. 26 (प्रतिनिधी)

गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने कमी-अधिक प्रमाणात संततधार कायम ठेवली होती. पावसामुळे शहरातील रस्ते जलमय होऊन वाहत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.

मघा नक्षत्राच्या शेवटच्या आठवडय़ात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरणात रिमङिाम पावसाला सुरुवात झाली. सकाळी 10.30 नंतर मोठा पाऊस सुरू झाला. नेहमीप्रमाणे कामाला जाणा:या कामगारांची, शाळेच्या विद्याथ्र्याची मोठी धावपळ झाली. पावसापासून वाचण्यासाठी रेनकोट, छत्री यांचा वापर करीत नागरिक घराबाहेर पडत होते. वेळेवर कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिक तत्काळ रिक्षातून प्रवास करीत होते. शहरात ठिकठिकाणच्या चौकात व मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्डय़ात पाणी साचल्याने दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रवास करणे कठीण झाले होते. एस.टी. स्टँड परिसरात एकेरी वाहतुकीच्या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी जमा झाले होते. वाहनांची वर्दळ आणि पाण्याच्या प्रवाहामुळे पायी चालत जाणा:या-येणा:या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. शहर परिसरात दिवसभरात 9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.


solapur pune pravasi sangatana