सोलापूर 'तापू' लागले; पारा 38 अंशावर

22/03/2011 12:15

सोलापूर - उन्हाच्या झळा सोलापूरकरांना जाणवू लागल्या आहेत. पारा 38 अंशाच्याही पुढे सरकला आहे. शहर व परिसरात तापमान मागील दहा दिवसांपासून सतत वाढत चालले आहे.

शहरातील तापमान आठ मार्चपासून सतत वाढत गेले आहे. त्या दिवशी 38.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होती. त्यापूर्वी एक ते सात मार्च दरम्यान 33 ते 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र 10 मार्च रोजी 38.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ते आजपर्यंत कायम राहिले आहे. त्यात किंचीत वाढ होत चालली आहे. अकरा ते 16 मार्च दरम्यान 38 अंश सेल्सिअस पुढे तापमानाची नोंद झाली आहे. हा चढउतार होत असलातरी सोलापूरकरांना उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत.

सकाळी अकरा वाजल्यानंतर ऊनाची जाणीव होत आहे. दुपारी बारा ते साडेतीन वाजेपर्यंत ऊनाचे चटके बसत आहेत. त्यामुळे दुपारी वाहनांची वर्दळही मंदावली आहे. तर गॉगलधारी आणि टोपी घातलेले वाहनधारक रस्त्यावर दिसू लागले आहेत. सायंकाळच्या गारव्यात फिरायला बाहेर पडणाऱ्यांची संख्याही हळूहळू वाढू लागली आहे.


solapur pune pravasi sangatana