अजुनि आयपीएलच्या प्रतीक्षेत मी..

कोलकाता, २० एप्रिल/पीटीआय
इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत खेळण्याचे भारताचा माजी संघनायक सौरव गांगुलीचे स्वप्न अद्याप भंगलेले नाही. चालू आयपीएल स्पध्रेत खेळण्याची आपली इच्छा पूर्ण होऊ शकते याबाबत तो विलक्षण आशावादी आहे. आयपीएलच्या चौथ्या हंगामात तू अजून खेळू शकतोस का, या प्रश्नाला उत्तर देताना गांगुली म्हणाला की, पाहूया.. मी काहीच बोलणार नाही. श्रीलंकेचा कर्णधार महेला जयवर्धने सध्या कोची टस्कर्स केरळ संघाचे नेतृत्व करीत आहे. पण इंग्लंड दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातच जयवर्धनेला मायदेशात परतावे लागणार आहे. या परिस्थितीत ३८ वर्षीय गांगुली मात्र स्वप्नांचे इमले बांधतो आहे. जयवर्धने गेल्यावर गांगुलीकडे कोचीचे कर्णधारपद देण्यात येईल अशी चर्चा आहे


solapur pune pravasi sangatana