कलमाडी यांची हकालपट्टी!

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे प्रभारी अध्यक्षपद विजयकुमार मल्होत्रांकडे
नवी दिल्ली, २६ एप्रिल

भ्रष्टाचारप्रकरणी अटक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुरेश कलमाडी यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेवरील १५ वर्षांची सत्ता खालसा झाली आहे. कलमाडी यांची संघटनेच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली असून, ज्येष्ठ क्रीडा प्रशासक प्रा. विजयकुमार मल्होत्रा यांची निर्विवादपणे प्रभारी अध्यक्षपदासाठी नेमणूक करण्यात आली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या मल्होत्रा यांच्या अध्येक्षतेखाली झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संघटनेच्या घटनेतील नियम ‘१३-ब’चा अवलंब करून कलमाडी यांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे. या नियमानुसार अध्यक्षाच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष संघटनेची अंतिम जबाबदारी स्वीकारतो.
कलमाडी यांना झालेल्या अटकेच्या पाश्र्वभूमीवर शहराबाहेर असलेले सरचिटणीस रणधीर सिंग यांच्याशी चर्चा करून लवकरच भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारिणी मंडळाची बैठक बोलवण्यात यावी अशी चर्चा झाली, अशी माहिती मल्होत्रा यांनी दिली. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या घटनेनुसार, संघटनेचे कार्य पुढे चालू राखण्यासाठी पद रिकामे ठेवू नये. त्यामुळे मी प्रभारी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे, असे मल्होत्
रा यावेळी म्हणाले.  


solapur pune pravasi sangatana