चेन्नईचा कोचीवर निसटता विजय

चेन्नई, १८ मे
अखेरच्या षटकात कोची टस्कर्स केरळला चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळविण्यासाठी १९ धावांच गरज होती.. चौफेर फटकेबाजी करणारा ब्रॅड हॉज आणि ओवेश शहा हे दोघेही नावाजलेले फलंदाज खेळपट्टीवर होते.. त्यावेळी सामना दोलायमान अवस्थेत होता.. कोची जिंकणार की चेन्नई हा प्रश्न साऱ्यांना सतावत होता.. पण डग बोलिंगरने अखेरच्या षटकात तिखट मारा करत आठ धावा दिल्या आणि चेन्नईने कोचीवर ११ धावांनी विजय संपादन करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकविले. वृद्धिमान साहाच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईने कोची पुढे १५३ धावांचे आव्हान ठेवले होते, कोचीला मात्र यावेळी १४१ धावाच करता आल्या. साहालाच यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
चेन्नईच्या १५३ धावांचा पाठलाग करताना कोचीच्या संघाची सुरुवात चांगली झालाी नव्हती. पण सलामीवीर ब्रेन्डन मॅक्क्युलम (३३) एका बाजूने किल्ला लढवत होता. तो बाद झाला तेव्हा कोचीची सामन्यावरची पकड ढीली होईल असे वाटत होते. पण ब्रॅड हॉजने चौफर फटकेबाजी करत कोचीच्या आश जिंवत ठेवल्या. त्याने ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावा फटकाविल्या असल्या तरी दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.
तत्पूर्वी, मायकेल हसी (३२) आणि वृद्धिमान साहा यांच्या फलंदाजीच्या जोरावर चेन्नईला १५२ धावा करता आल्या. मुरली विजय (१६), एस. बद्रीनाथ (१३), सुरेश रैना (१९) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (९) यांना लौकिकला साजेशी फलंदाजी करता न आल्याने चेन्नईचा संघ दिडशे धावांचा टप्पा ओलांडणार नाही, असे वाटत होते. पण वृद्धिमान साहा याने ३३ चेंडूत १ चौकार आणि षटकारांच्या मदतीने नाबाद ४६ धावा फटकावत संघाला दिडशे धावांचा टप्पा ओलांडून दिला.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज - : २० षटकांत ५ बाद १५२ (वृद्धिमान साहा नाबाद ४६, मायकेल हसी ३२, एस. श्रीशांत २३ धावांत १ बळी) विजयी वि. कोची टस्कर्स केरळ -: २० षटकांत ५ बाद १४१ (ब्रॅड हॉज नाबाद ५१, ब्रेन्डन मॅक्क्युलम ३३, शादाब जकाती २३ धावांत १ बळी). सामनावीर- : वृद्धिमान साहा.    


solapur pune pravasi sangatana