जयसूर्या करणार पुनरागमन?

लंडन  - श्रीलंकेचा धडाकेबाज अष्टपैलू सनथ जयसूर्या वयाच्या 41 वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्‍यता आहे. एकदिवसीय सामन्यातील नियमित सलामीवीर उपुल थरंगा उत्तेजक चाचणीमध्ये दोषी आढळ्याने त्याच्या जागी जयसूर्याची निवड होऊ शकेल. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेली कसोटी मालिका संपल्यानंतर श्रीलंका एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 सामन्यांचीही मालिका खेळणार आहे. येत्या 30 जूनला 42 वा वाढदिवस असणारा जयसूर्या सध्या खेळत असलेल्यांपैकी वयाने सर्वांत मोठा क्रिकेटपटू आहे. जयसूर्या म्हणाला, ""निवड समितीने मला बोलाविल्यास मी खेळण्यासाठी तयार आहे. देशासाठी खेळण्यासाठी मी कायम तयार असतो.''


solapur pune pravasi sangatana