तिलकरत्ने दिल्शानला दुखापत

लंडन  - इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत फलंदाजी करताना उजव्या हाताचा अंगठा "फ्रॅक्‍चर' झाल्याने श्रीलंकेचा कर्णधार तिलकरत्ने दिल्शानला काही दिवसांची विश्रांती घ्यावी लागणार आहे. लॉर्डसवरील कसोटीतील पहिल्या डावात दिल्शानने 193 धावा केल्या होत्या. या खेळीदरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस ट्रेम्लेटचा उसळता चेंडू दोन वेळा दिल्शानच्या बोटांवर आदळला. कार्डिफमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीदरम्यानही ट्रेम्लेटचा वेगवान चेंडू दिल्शानला याच जागी लागला होता. या तिन्हीवेळी दिल्शानवर मैदानातच उपचार करणे भाग पडले होते. या दुखापतीमुळे सामन्याच्या चौथ्या दिवशी दिल्शान मैदानात उतरला नव्हता. श्रीलंका संघाच्या प्रवक्‍त्याने सांगितले, की दिल्शानचे बोट फ्रॅक्‍चर झाले असून त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दिल्शान म्हणाला, ""डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेणार आहे. मात्र, दोन ते तीन दिवसांमध्ये पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकेन.''


solapur pune pravasi sangatana