धोनी सुपर; चेन्नई किंग्ज

चेन्नई, १२ मे
गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या धडाकेबाज अर्धशतकी ‘सुपर’ खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला मगे टाकत आपणच ‘किंग्ज’ असल्याचे आज दाखवून दिले. धोनीच्या ३१ चेंडूत नाबाद ६३ धावा आणि त्याला एस. बद्रीनाथची अर्धशतकी साथ मिळाल्याने चेन्नईला प्रथम फलंदाजी करताना १७६ धावा करता आल्या. वीरेंद्र सेहवागविना खेळणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला चेन्नईचे १७७ आव्हान पेलवले नाही आणि त्यांना १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. धोनीने नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर विजयासह सामनावीराचा पुरस्कारही पटकाविला.
१७७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीची चेन्नईच्या गोलंदाजांनी पुरती हवा काढून टाकली. इरफान पठाण (नाबाद ४४) आणि वेणुगोपाल राव (३०) यांनी चेन्नईच्या गोलंदाजांचा प्रतिकार केला खरा, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. आर. अश्विन आणि ड्वेन ब्राव्हो यांनी स्वस्तात प्रत्येकी दोन मोहरे टिपत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्जला कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे तडफदार नाबाद अर्धशतक आणि त्याला एस. बद्रीनाथची मिळालेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सपुढे १७७ धावांचे आव्हान ठेवता आले.
सेहवागविना खेळणाऱ्या दिल्लीच्या संघाने यावेळी फार्मात असलेल्या मायकेल हसीला (५) स्वस्तात बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. पण मुरली विजय (३५) , एस. बद्रीनाथ आणि कर्णधार धोनी यांनी दमदार फलंदाजी करत संघाला सावरले. हसी बाद झाल्यावर मुरली विजयने एक बाजू खंबूरपणे लावून धरली. तो बाद झाल्यावर चेन्नईचा संघ कोसळेल असे वाटले होते. पण बद्रीनाथ आणि धोनी या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी रचत संघाची पडछड थांबवली आणि दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. बद्रीनाथपेक्षा धोनी यावेळई जास्त आक्रमक वाटला आणि तो दिल्लीच्या गोलंदाजांवर अक्षरक्ष: तुटून पडला. त्याने फक्त ३१ चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ६३ धावा लूटल्या. तर बद्रीनाथने यावेळी सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५५ धावा फटकाविल्या.  
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज-:
२० षटकांत ४ बाद १७६ (महेंद्रसिंग धोनी नाबाद ६३, एस. बद्रीनाथ ५५, वरुण अ‍ॅरॉन २० धावांत १ बळी). विजयी वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स- : २० षटकांत ६ बाद १५८ (इरफान पठाण नाबाद ४४, आर. अश्विन १९ धावांत २ बळी, ड्वेन ब्राव्हो २१ धावांत २ बळी).
सामनावीर-: महेंद्रसिंग धोनी.


solapur pune pravasi sangatana