पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेऐवजी गेलची आयपीएलला पसंती

नवी दिल्ली, २० एप्रिल/पीटीआय
वेस्ट इंडिजचा धडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल याला आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळण्यास वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाकडून परवानगी मिळाली आहे. तो ऑस्ट्रेलियाचा जखमी खेळाडू डर्क नेन्सऐवजी खेळणार आहे. गेलला आज बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. परंतु वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने गेलचा निर्णय हा अस्वीकारार्ह आणि निराशाजनक आहे, असे नमूद केले आहे. त्याला रॉयल चॅलेंजर्सने चार लाख डॉलर्स आधारभूत मानधन देत करारबद्ध केले आहे. रॉयल चॅलेंजर्सचे मालक विजय मल्ल्या यांनी येथे ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, गेलच्या सहभागामुळे आमचा संघ अधिकच बळकट होणार आहे. पाकिस्तानशी शनिवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसाच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी विंडीज संघात गेलचा विचार करण्यात आलेला नाही. आयपीएलच्या पहिल्या तीन स्पर्धामध्ये गेल कोलकाताकडून खेळला होता.


solapur pune pravasi sangatana