बीसीसीआयची विनंती श्रीलंकेने फेटाळली

बीसीसीआयची विनंती श्रीलंकेने फेटाळली

कोलंबो, २० एप्रिल / पीटीआय
आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंना पाच मेपर्यंत माघारी बोलाविण्याच्या निर्णयाशी ठाम राहत श्रीलंकेने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या खेळाडूंना १५ मेपर्यंत आयपीएलमध्ये खेळण्यास परवानगी देण्याबाबत केलेली मागणी फेटाळून लावली.
बीसीसीआय व श्रीलंका क्रिकेट मंडळ यांच्यात या विषयाबाबत प्रत्यक्ष सविस्तर चर्चा झाली नसली, तरी भारतीय पदाधिकाऱ्यांनी लंकेच्या क्रिकेट पदाधिकाऱ्यांकडे संपर्क साधला होता आणि या खेळाडूंना १५ मे पर्यंत भारतात राहण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. मात्र क्रीडामंत्री महिंदानाद आलुथगमागे यांनी या विनंतीकडे दुर्लक्ष करीत पाच मेपर्यंत आपल्या खेळाडूंना माघारी बोलाविण्याच्या निर्णयाशी ठाम राहण्याचे ठरविले आहे.
श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, आलुथगमागे, श्रीलंका क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी व राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य यांच्यात काल येथे सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. लंकेच्या कुमार संगकारा, माहेला जयवर्धने, नुकतीच कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलेला तिलकरत्ने दिलशान यांच्यासह अकरा खेळाडूंना मंडळाचा आदेश बांधील असल्याचे समजते.
खेळाडूंनी आयपीएलपेक्षा श्रीलंका क्रिकेटला प्राधान्य द्यावे असे सांगून आलुथगमागे म्हणाले, बीसीसीआयला आम्ही लवकरच तपशीलवार पत्र पाठविणार आहोत.   आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेल्या लंकेच्या खेळाडूंनी पाच मे रोजी कोलंबो येथे उपस्थित राहावे असा आदेश श्रीलंका क्रिकेट मंडळाने दिला आहे. १० मे रोजी श्रीलंकेच्या इंग्लंड दौऱ्यास प्रारंभ होत आहे


solapur pune pravasi sangatana