भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी डंकन फ्डेचर

मुंबई, २७ एप्रिल / क्री. प्र.
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी गॅरी कर्स्टनचे वारसदार म्हणून झिम्बाब्वेच्या डंकन फ्डेचर यांची आज निवड करण्यात आली. झिम्बाब्वेचे माजी कर्णधार असणाऱ्या ६२ वर्षीय फ्डेचर यांची दोन वर्षांसाठी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली असून, यापूर्वी त्यांनी १९९९ ते २००७ या कालावधीत इंग्लंड संघाच्या प्रशिक्षकपदाची भूमिका पार पाडली असून, त्यात त्यांना संमिश्र यश लाभले होते. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या येथे झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत कर्स्टनचे वारसदार म्हणून फ्डेचर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बोर्डाचे सचिव एन. श्रीनिवासन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात फ्डेचर यांची निवड दोन वर्षांसाठी असल्याचे म्हटले आहे.
मात्र फ्डेचर यांच्या पूर्वीच्या करारांमुळे येत्या जून-जुलै महिन्यात होणाऱ्या भारतीय संघाच्या विंडीज दौऱ्यापूर्वी ते संघात दाखल होऊ शकतील का, ते मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. कर्स्टन यांच्या कारकीर्दीत संघाच्या गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणारे एरिक सिमन्स हे त्याच पदावर कायम राहतील अशीही पुस्ती त्यांनी जोडली आहे. दरम्यान, बोर्डाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी फ्डेचर यांच्या सेवा-शर्ती या कर्स्टन यांच्याप्रमाणेच असतील असे म्हटले आहे.
खरे तर आज फ्डेचर यांची प्रशिक्षकपदी झालेली निवड ही धक्कादायकच होती. कारण कार्यकारी समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे कुठलेही संकेत देण्यात आलेले नव्हते. मात्र अत्यंत विचारपूर्वक सर्वाशी सल्ला-मसलत केल्यानंतर बोर्डाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी कार्यकारी समितीसमोर हा प्रस्ताव मांडला व तो मान्य करण्यात आला. या बैठकीत सध्याचे इंग्लंड संघाचे प्रशिक्षक अ‍ॅन्डी फ्डॉवर यांच्याही नावाचा विचार करण्यात आला, पण ते या पदासाठी फारसे उत्सुक नाहीत असे बोर्डातील प्रवक्त्याने म्हटले आहे.
डंकन फ्डेचर इंग्लंड संघाचे प्रशिक्षकपद सोडल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघासाठी फलंदाजीचे प्रशिक्षक झाले आणि या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी ते या पदावर होते. गेल्या वर्षी न्यूझीलंड संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता त्या वेळीही ते न्यूझीलंडचे फलंदाजीचे प्रशिक्षक होते. १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वे संघाचे प्रशिक्षक असणारे फ्डेचर हे आपल्या संघासाठी केवळ सहा एकदिवशीय सामने खेळले आहेत. इंग्लंड संघाचे प्रशिक्षक असताना त्यांना संमिश्र यश लाभले होते. २००५ मध्ये इंग्लंड संघाने तब्बल ३६ वर्षांनी मायदेशात ऑस्ट्रेलियाला नमवून अ‍ॅशेस पटकावले ही फ्डेचर यांची प्रशिक्षक म्हणून सर्वोत्तम कामगिरी ठरली व त्याच काळात इंग्लंडने कसोटी क्रमवारीत तिसरे स्थानही पटकावले होते. फ्डेचर हे त्या वेळी इंग्लंड संघासाठी पहिले परदेशी प्रशिक्षक होते.
आणि त्यांनी इंग्लंडला सलग आठ कसोटी सामने जिंकून दिले होते. त्यांच्या या कामगिरीचा ब्रिटनच्या शाही घराण्यातर्फे विशेष गौरव करण्यात आला होता. त्यानंतर मात्र इंग्लंड संघाच्या कामगिरीत घसरण सुरू झाल्याने प्रशिक्षक म्हणून डंकन फ्डेचर यांच्या कार्यक्षमतेबाबतच शंका घेतल्या जाऊ लागल्या. इंग्लंडने नंतर भारत-पाकिस्तानविरुद्धच्या मालिका बरोबरीत सोडविल्या, पण नंतर २००६-०७ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला व्हाइटवॉश दिल्यानंतर प्रशिक्षक फ्डेचर यांच्यावर सर्वच स्तरांतून टीकेचा वर्षांव झाला. फ्डेचर यांनी त्या वेळीही प्रशिक्षकपद सोडण्यास नकार दिला. मात्र २००७ च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचे आव्हान लवकर संपुष्टात आले आणि त्यांना प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणे भाग पडले.


solapur pune pravasi sangatana