राजस्थान का दी एन्ड!रॅड हॉजच्या अष्टपैलू कामगिरीमुळे कोचीचा आरामात विजय

इंदोर, १५ मे
ब्रॅड हॉज याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर कोची टस्कर्स संघाने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्सचा ‘दी एन्ड’ केला. आठ विकेट आणि १२.४ षटके बाकी राखून कोचीने हा विजय मिळविला. हॉज (४/१३) याच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर कोची संघाने राजस्थानचा डाव १८.३ षटकांत केवळ ९७ धावांमध्ये गुंडाळले. त्यानंतर विजयासाठी आवश्यक असणाऱ्या ९८ धावा त्यांनी केवळ ७.२ षटकांतच पार केल्या. आजच्या मोठय़ा विजयामुळे कोची संघाच्या आशा कायम राहिल्या आहेत.
शेन वॉटसन (तीन षटकारांसह २०), अशोक मणेरिया (३ चौकार व एक षटकारासह ३१) व फैज फाझल (तीन चौकारांसह १६) यांनी दमदार खेळी करुनही राजस्थानला तीन आकडी धावा करता आल्या नाहीत. हॉजने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करीत चार षटकांत केवळ १३ धावा देत चार बळी घेतले. त्याला एस. श्रीशांत (२/१६) व पी.परमेश्वरन (२/२०) यांनी सुरेख साथ दिली.
ब्रॅन्डन मॅक्क्युलम याने चार षटकार व एक चौकार अशी आतषबाजी करीत २९ धावा केल्या आणि कोची संघास भक्कम सुरुवात करुन दिली होती. त्याच्यापाठोपाठ माहेला जयवर्धने हाही झटपट बाद झाल्यानंतर पार्थिव पटेल (२ चौकार व एक षटकारासह नाबाद २१) व ब्रॅड हॉज (पाच चौकार व दोन षटकारांसह नाबाद ३३) यांनी ५३ धावांची अखंडित भागीदारी केली आणि संघास आठव्या षटकांतच विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स : १८.३ षटकांत सर्वबाद ९७ (फैज फाझल १६, शेन वॉटसन २०, अशोक मणेरिया ३१, शॉन टेट नाबाद १०, ब्रॅड हॉज ४/१३, एस.श्रीशांत २/१६, पी.परमेश्वरन २/२०)
पराभूत वि. कोची टस्कर्स : ७.२ षटकांत २ बाद ९८ (ब्रॅन्डन मॅक्क्युलम २९, पार्थिव पटेल नाबाद २१, ब्रॅड हॉज नाबाद ३३). सामनावीर : ब्रॅड हॉज. 


solapur pune pravasi sangatana