राजस्थानचा कोचीवर दणदणीत विजय

कर्णधार शेन वॉर्न ठरला सामनावीर
जयपूर, २४ एप्रिल

प्रभावी गोलंदाजीपाठोपाठ शेन वॉटसन व राहुल द्रविड यांच्या शैलीदार खेळाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोची टस्कर्स संघाचा आठ गडी व ३५ चेंडू राखून पराभव केला. विजयासाठी ११० धावांचे आव्हान त्यांनी १४.१ षटकांत व दोन विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. राजस्थान रॉयल्सने नाणेफेकजिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरविला. पार्थिव पटेल व रवींद्र जडेजा यांनी ४८ धावांची भागीदारी करुनही कोची संघाचा डाव २० षटकांत १०९ धावांमध्ये कोसळला. पटेलने दोन चौकारांसह ३२ धावा केल्या तर जडेजाने २३ चेंडूंत २२ धावा करताना दोन चौकार मारले. या दोघांखेरीज कर्णधार माहेला जयवर्धने (१३) हा एकच फलंदाज दोन आकडी धावा करु शकला. राजस्थानकडून सिद्धार्थ त्रिवेदीने १९ धावांमध्ये तीन विकेट्स बाद केले तर कर्णधार शेन वॉर्नने १६ धावांमध्ये तीन बळी घेतले. विजयासाठी ११० धावांचे आव्हानास सामोरे जाताना राजस्थानच्या शेन वॉटसन व राहुल द्रविड यांनी सलामीसाठी १०.४ षटकांत ७१ धावांची भागीदारी केली. द्रविडने ३७ चेंडूंमध्ये एक षटकार व चार चौकारांसह ४४ धावा केल्या. वॉटसनने ४० चेंडूंत ४९ धावा करताना चार चौकार व दोन षटकार अशी फटकेबाजी केली.     

संक्षिप्त धावफलक
कोची टस्कर्स २० षटकांत सर्वबाद १०९ (माहेला जयवर्धने १३, पार्थिव पटेल ३२, रवींद्र जडेजा २२, सिद्धार्थ त्रिवेदी ३/१९, शेन वॉर्न ३/१६)
पराभूत वि. राजस्थान रॉयल्स- १४.१ षटकांत २ बाद १११ (राहुल द्रविड ४४, शेन वॉटसन ४९, जोहान बोथा नाबाद १४).
सामनावीर-: शेन वॉर्न.   


solapur pune pravasi sangatana