वरुणराजा आणि सिमॉन्सने संपवला विंडीजचा विजयाचा दुष्काळ!

ब्रिजटाऊन (बार्बाडोस), ३ मे
मोहम्मद हाफीझने एकदिवसीय क्रिकेटमध्ये साकारलेले दुसरे शतक पाऊस आणि लेंडल सिमॉन्सने फटकावलेल्या धडाकेबाज ७६ धावांमुळे वाया गेले. पावसामुळे डकवर्थ-लुईस नियमाचा अवलंब केल्यामुळे चौथा एकदिवसीय सामना पाकिस्तानने अवघ्या एका धावेने गमावला.वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरू असताना मुसळधार पावसाची वृष्टी झाल्यामुळे आधी ३९ षटकांत २२३ धावांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले. वेस्ट इंडिजने सलग सहा पराभवांनंतर हा विजय प्राप्त केला. याचप्रमाणे पाकिस्तानविरुद्ध सलग आठ पराभवांनंतर हा विजय साकारला आहे.
पाकिस्तानचा संघनायक शाहीद आफ्रिदीला ड्वेन ब्राव्हाने मिड-विकेटला षटकार खेचला आणि वेस्ट इंडिजने डकवर्थ-लुईस नियमानुसार आवश्यक २९.५ षटकांत ४ बाद १५४ ही धावसंख्या उभारली. त्यामुळे एकदिवसीय मालिकेत विंडीजला पहिलावहिला विजय संपादन करता आला. आता पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानकडे ३-१ अशी आघाडी असून, पाचवा सामना गुरुवारी गयाना नॅशनल स्टेडियमवर होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान : ५० षटकांत ९ बाद २४८ (मोहम्मद हाफीझ १२१, असद शफिक ७१; देवेंद्र बिशू ३/३७) विजयी वि. वेस्ट इंडिज : २९.५ षटकांत ४ बाद १५४ (लेंडल सिमॉन्स ७६; जुनैद खान २/२६).


solapur pune pravasi sangatana