वल्थाटीची फलंदाजी पाहणे ही मेजवानीच - शॉन मार्श

नवी दिल्ली, १९ एप्रिल/ पीटीआय
मुंबईकर पॉल वल्थाटीने आयपीएलमधले पहिले शतक झळकाविले आणि रातोरात तो स्टर झाला. यापूर्वी त्याच्याकडे गुणवत्ता नव्हती असे नाही, पण या शतकामुळे तो थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला. शतक झळकाविल्यापासून पॉल ऐन भरात आलाय, त्याची फलंदाजी प्रेक्षकांबरोबरच भावू लागली आहे ती सलामीवीर शॉन मार्शला. पॉलच्या या दणदणीत शतकामुळे शॉनला आपली सलामीची जागा सोडावी लागली असली तरी, वल्थाटीची फलंदाजी पाहणे ही एक मेजवानी असते, अशी खिलाडूवृत्तीने दाद द्यायला शॉनला कमीपणा वाटत नाही.
पॉल हा खरोखरच एक चांगला खेळाडू आहे आणि त्याची फलंदाजी पाहताना मजा येते. गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याने चमकदार कामगिरी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिलेला आहे. त्याची फलंदाजी करण्याची शैली चांगली असून त्याची फलंदाजी पाहणे ही एक मेजवानीच असते. त्याचबरोबर त्याच्याकडे उपयुक्त गोलंदाजी करण्याचीही क्षमता असून तो एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, असे मार्श म्हणाला.
२००८ साली झालेल्या आयपीएलमध्ये मार्शने सर्वाधिक धावा करत ‘ऑरेंज कॅप’ पटकाविली होती. त्यावेळी पहिले चारही सामने पंजाबच्या संघाने गमावलेले होते, पण मार्शने मात्र त्यावेळी धावांची टाकसाळच उघडली होती. सध्या तो चांगल्या फॉर्मात नसला तरी पॉलची फलंदाजीचा मात्र तो आनंद लूटून बरेच काही शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
आयपीएलच्या पहिल्या हंगामात माझ्याकडून चांगली फलंदाजी झाली होती आणि त्याचा फायदाही मला झाला. पण त्यानंतर दुखापतींनी मला ग्रासले आणि माझा फॉर्म मी हरवून बसलो. सध्या माझ्याकडून चांगली कामगिरी होत नाही, हे मला ठाऊक आहे. पॉल आणि स्पर्धेतील अन्य काही फलंदाजांना पाहून मी बरेच काही शिकतो आहे. यापुढे माझ्याकडूनही चांगली कामगिरी होईल, अशी मला आशा असून सातत्याने चांगली कामगिरी करण्यावर माझा यापुढे भर असेल, असे मार्श म्हणाला


solapur pune pravasi sangatana