विजयी मालिका राखण्याचेच ध्येय - सेहवाग

नवी दिल्ली, २४ एप्रिल
किंग्ज इलेव्हन पंजाबवर २९ धावांनी मात केल्यानंतर दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार वीरेंद्र सेहवाग हा आयपीएल क्रिकेट स्पर्धेत विजयी मालिका राखण्यासाठीच उत्सुक आहे.  दिल्ली संघाने पहिले दोन सामने गमावले होते व तिसऱ्या सामन्यात विजय मिळविला होता. तथापि, त्यांना चौथ्या लढतीत डेक्कन चार्जर्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. संघाच्या कामगिरीविषयी सेहवाग म्हणाला, या स्पर्धेतील संघाच्या खेळाडूंची कामगिरी पाहता असे लक्षात येते, की प्रत्येक संघास एक-दोन सामने गमवावे लागले आहेत, तर एक-दोन लढतींमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. आता पंजाबवर मात केल्यामुळे आमचे मनोधैर्य उंचावले आहे आणि पुढच्या लढतीही जिंकण्याचेच आमचे ध्येय आहे.
फिरोजशहा कोटला स्टेडियमवरील खेळपट्टीविषयी समाधान व्यक्त करीत सेहवाग म्हणाला, या खेळपट्टीवर मुक्तपणे फटकेबाजी करण्याची संधी सर्वाना मिळाली आणि ट्वेन्टी २० सामन्यासाठी अशीच खेळपट्टी योग्य आहे. गोलंदाजांना मात्र बळी मिळविण्यासाठी सर्वस्व पणाला लावायला लागले. पंजाबचा कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्टची महत्त्वपूर्ण विकेट घेणाऱ्या वरुण एरॉनने चांगली गोलंदाजी केली. तो अचूक टप्प्यावर व चांगल्या वेगाने गोलंदाजी करतो. त्याला उज्ज्वल भवितव्य आहे.  

 


solapur pune pravasi sangatana