सचिन हा सर्वश्रेष्ठ - व्हीवियन रिचर्डस

पोर्ट ऑफ स्पेन - "मी पाहिलेल्या फलंदाजांपैकी सचिन तेंडुलकर हा सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे,'' असे मत वेस्ट इंडीजच्या सर व्हीवियन रिचर्डस यांनी व्यक्त केले. "मी डॉन ब्रॅडमन यांना खेळताना पाहिलेले नाही. मात्र, माझ्या क्रिकेटमधील कारकिर्दीमध्ये सचिन तेंडुलकरपेक्षा चांगला फलंदाज मी अजून पाहिलेला नाही, किंबहुना सचिनपेक्षा चांगला फलंदाज अजून झालेला नाही,'' असे रिचर्डस म्हणाले. या वेळी ब्रायन लारा, रिकी पॉंटिंग आणि जॅक कॅलिस या समकालीन फलंदाजांपेक्षा, तसेच सुनील गावसकर अथवा जावेद मियॉंदाद यांच्यापेक्षाही तेंडुलकर श्रेष्ठ फलंदाज असल्याचे प्रमाणपत्र रिचर्डस यांनी दिले आहे.

"सचिनच्या कारकिर्दीचा आलेख हा सर्व संकटांवर मात करत सतत उंचावलेला आहे आणि ही सर्वांत वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. एक क्रिकेटपटू म्हणून मी इतर कोणाहीपेक्षा सचिनचा आदर जास्त करतो. तो एक "परिपूर्ण खेळाडू' आहे,'' असे रिचर्डस यांनी सांगितले. या वेळी रिचर्डस यांनी विंडीज दौऱ्यावर न येण्याच्या सचिनच्या निर्णयाचेही समर्थन केले.


solapur pune pravasi sangatana