सानिया-एलेनाची जोडी आता तिसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली - भारताची हरहुन्नरी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत 14व्या क्रमांकापर्यंत भरारी घेतली आहे. तिने 11 क्रमांक प्रगती केली आहे. रशियाची जोडीदार एलेना व्हेस्निना हिच्या साथीत सानियाने फ्रेंच स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले. या कामगिरीमुळे मोसमाच्या क्रमवारीत "डब्ल्यूटीए चॅंपियनशिप रेस'मध्ये एलेनाने तिसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारली आहे.

सानिया-एलेना यांनी यंदाच्या मोसमात दोन "डब्ल्यूटीए' विजेतीपदे मिळविली आहेत. मोसमाची सांगता करणाऱ्या स्पर्धेत स्थान मिळविण्याची त्यांना संधी आहे. त्यांचे 3606 गुण आहेत. पहिल्या चार जोड्या या स्पर्धेला पात्र ठरणार आहेत. तुर्कस्तानमधील इस्तंबूल शहरात ही स्पर्धा होणार आहे. ताज्या क्रमवारीत क्वेटा पेश्‍की (चेक प्रजासत्ताक)-कॅटरीना स्रीबॉट्‌न्÷िनक (स्लोव्हाकिया) 4395 गुणांसह पहिल्या स्थानावर आहेत. रशियाची मारिया किरीलेन्को आणि बेलारुसची व्हिक्‍टोरिया अझारेन्का यांची जोडी 3865 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.

एकेरीतही सानियाचा क्रमांक उंचावला आहे. तिने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. 72 वरून तिने 58वे स्थान गाठले आहे.

पुरुष एकेरीत सोमदेव देववर्मनची एक क्रमांक घसरण झाली असून त्याचा 67वा क्रमांक आहे. दुहेरीत रोहन बोपण्णाने दहावे स्थान गाठले, तर लिअँडर पेसने "टॉप टेन'मधील स्थान गमावले. पेसचा 11वा क्रमांक आहे. महेश भूपतीने पाचवा क्रमांक कायम राखला.


solapur pune pravasi sangatana