स्टुअर्ट क्लार्कचा क्रिकेटला रामराम

सिडनी, १८ मे/ पीटीआय
महान गोलंदाज ग्लेन मॅग्रा निवृत्त झाल्यावर त्याची जागा घईल असा एक गोलंदाज ऑस्ट्रेलियाला मिळाला होता, तो म्हणजे स्टुअर्ट क्लार्क. पण दुखापती आणि कमी मिळालेली संधी यामुळे त्याने अखेर क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला असून यानंतर ‘सिडनी सिक्सर्स बिग बॅश लीग’च्या व्यवस्थापकाच्या भूमिकेत तो दिसेल. जो पर्यंत क्रिकेटवर प्रेम आहे तो पर्यत नक्कीच मी क्रिकेट खेळत राहीन. पण ऑस्ट्रेलियामधील युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची संधी मला मिळाली असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याचा निर्णय मी घेतला आहे, असे क्लार्कने सांगितले.


solapur pune pravasi sangatana