२०१५ च्या विश्वचषक स्पध्रेत दहाच संघ हवेत!

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड आग्रही
मेलबर्न, २० एप्रिल/पीटीआय
२०१५मध्ये होणाऱ्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत दहाच संघ असायला हवे, अशी भूमिका यजमान ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने आज स्पष्ट केली आहे. सहसदस्य राष्ट्रांना सामावून घेण्याच्या उद्देशाने विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत अव्वल १० संघ सहभागी होतील, या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे नुकतेच आयसीसीने आश्वासन दिले होते. जूनमध्ये हाँगकाँगला होणाऱ्या वार्षिक परिषदेत या निर्णयाबाबत पुनर्विचार होईल, असे आश्वासन आयसीसीने दिले असतानाच सहयजमान ऑस्ट्रेलियाने अनुत्सुकता दर्शविली आहे. गुणवत्तेनुसार आयसीसी क्रमवारीतील दहा अव्वल संघांचा समावेश २०१५मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेत करण्यात यावा, असे मत ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने व्यक्त केले.


solapur pune pravasi sangatana