‘घरच्या मैदानावरील पुढील तिन्ही सामने जिंकायलाच हवेत’

मोहाली, २२ एप्रिल/पीटीआय
तीन सामन्यांत पत्करलेल्या पराभवानंतर राजस्थान रॉयल्सचा संघनायक शेन वॉर्न आता कमालीचा सावध झाला आहे. आयपीएलमध्ये आव्हान टिकविण्यासाठी पुढील १० दिवसांत घरच्या मैदानावरील तिन्ही सामने जिंकणे जिकीरीचे होऊन बसले आहे, अशी प्रतिक्रिया वॉर्नने व्यक्त केली आहे.गुरुवारी रात्री किंग्ज इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्सचा ४८ धावांनी पराभव केला. १९६ धावांचे अवघड आव्हान स्वीकारलेल्या पंजाबला २० षटकांत ७ बाद १४७ धावाच करता आल्या.आता आम्ही जयपूरमध्ये जाऊन १० दिवसांत ३ सामने खेळणार आहोत. तिन्ही सामने जिंकणे आमच्यासाठी आवश्यक आहे, असे ४१ वर्षीय वॉर्नने सांगितले. राजस्थानची २४ एप्रिलला कोची टस्कर्स केरळशी, २९ एप्रिलला मुंबई इंडियन्सशी तर १ मे रोजी पुणे वॉरियर्सशी गाठ पडणार आहे.घरच्या मैदानावर आम्हाला हरविणे अवघड आहे. आम्ही १२ पैकी ९ सामने जिंकले आहेत. परंतु कोची, मुंबई आणि पुण्याचे संघ आव्हानात्मक आहेत. त्यामुळे हे तिन्ही सामने रंगतदार होतील. आयपीएलमध्ये कुणीही कुणालाही हरवू शकतो, असे वॉर्न यावेळी म्हणाला.   


solapur pune pravasi sangatana