आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर-दौंडदरम्यान रेल्वेच्या विशेष गाड्या

16/07/2010 10:26

 आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर-दौंडदरम्यान रेल्वेच्या विशेष गाड्या

सोलापूर, दि. १५ (प्रतिनिधी)- आषाढी यात्रेनिमित्त यात्रेकरूंची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाच्या वतीने पंढरपूर-दौंडदरम्यान विशेष चार गाड्यांची सेवा, आमरावती-खामगाव ते पंढरपूर तसेच पंढरपूर-लातूर या विशेष गाडा १६ जुलै ते २६ जुलैच्या दरम्यान धावणार आहेत.
स्पेशल गाडी क्रमांक एक पंढरपूर-दौंड ही पंढरपूरहून चार वाजता सुटून दौंड येथे ९.४० वाजता पोहोचणार आहे. स्पेशल गाडी क्रमांक दोन दौंड-पंढरपूर ही दौंड येथून दुपारी १२ वाजता सुटून पंढरपूर येथे १६.२५ वाजता पोहोचणार आहे. स्पेशल गाडी क्रमांक तीन पंढरपूर-दौंड ही पंढरपूरहून १८.३० वाजता सुटून दौंड येथे २३.१५ वाजता पोहोचणार आहे. स्पेशल गाडी क्रमांक चार दौंड-पंढरपूर ही ००.१५ वाजता सुटून पंढरपूर येथे ५.३० वाजता पोहोचणार आहे. या गाडीस मोडनिब, कुर्डूवाडी, केम, जेऊर, पारेवाडी, भिगवण, दौंड येथे थांबा देण्यात आलेला आहे.
पंढरपूर ते लातूर विशेष गाडी
लातूर-पंढरपूर-लातूर विशेष गाडीची वेळ पुढीलप्रमाणे असून, ही गाडी पंढरपूर ते लातूर या स्थानकादरम्यान धावणार आहे. लातूर येथून प्रस्थान ९ वाजता, हरंगुळ येथे आगमन ९.१३, प्रस्थान ९.१३, औसा रोड आगमन ९.२५, प्रस्थान ९.२७, मुरुड आगमन ९.४८, प्रस्थान ९.५०, ढोकी आगमन १०.०३, प्रस्थान १०.०५, कळंब रोड आगमन १०.१३, प्रस्थान १०.१५, येडशी आगमन १०.२३, प्रस्थान १०.२५, पांगरी आगमन ११.२३, प्रस्थान ११.२५, बार्शी ११.५५, प्रस्थान ११.२५, बार्शी आगमन ११.५५, प्रस्थान ११.५८, शेंद्री आगमन १२.१८, प्रस्थान १२.२०, कुर्डूवाडी आगमन १३, प्रस्थान १३.०५, मोडनिब आगमन १३.२८, प्रस्थान १३.३०, पंढरपूर येथे १४.१० वाजता पोहोचणार आहे.
पंढरपूर-लातूर विशेष गाडी
पंढरपूर-लातूर या विशेष गाडीचे पंढरपूर येथून १४.४० वाजता प्रस्थान होणार आहे. मोडनिब आगमन १५.०८, प्रस्थान १५.१०, कुर्डूवाडी आगमन १५.४५, प्रस्थान १५.५०, शेंद्री आगमन १६.१३, प्रस्थान १६.१५, बार्शी आगमन १६.३५, प्रस्थान १६.१५, पांगरी आगमन १६.५८, प्रस्थान १७, उस्मानाबाद आगमन १७.२५, प्रस्थान १७.३०, येडशी आगमन १७.४१, प्रस्थान १७.४३, कळंब रोड आगमन १७.५३, प्रस्थान १७.५५, ढोकी आगमन १८.०३, प्रस्थान १८.०५, मुरुड आगमन १८.२८, प्रस्थान १८.३०, औसा रोड आगमन १८.४८, प्रस्थान १८.५०, हरंगुळ आगमन १९.०३, प्रस्थान १९.०५, लातूर येथे १९.४० वाजता पोहोचणार आहे.
अमरावती, खामगाव-पंढरपूर गाडी
गाडी क्रमांक ०१३१ अमरावती, खामगाव ते पंढरपूरपर्यंत आषाढी विशेष गाडीची सेवा १५, १६, १८ व १९ जुलैपर्यंत अमरावती, खामगाव स्टेशनवरून १४ वाजता सुटणार आहे. मनमाड आगमन २३.२०, प्रस्थान २३.३५, कोपरगाव आगमन ००.३०, प्रस्थान ००.३३, बेलापूर आगमन १.२३, प्रस्थान १.२५, अहमदनगर आगमन २.५०, प्रस्थान २.५५, दौंड आगमन ४.२५, प्रस्थान ४.३५, भिगवण आगमन ५, प्रस्थान ५.०२, जेऊर आगमन ५.३८, प्रस्थान ५.४०, कुर्डूवाडी आगमन ७, प्रस्थान ७.१५, पंढरपूर येथे सकाळी ८.२५ वाजता पोहोचणार आहे.
पंढरपूर-अमरावती, खामगाव गाडी
गाडी क्रमांक क्रमांक ०१३२ पंढरपूर ते अमरावती, खामगाव आषाढी विशेष गाडीची सेवा १६, १७, २२, २३ जुलैपर्यंत असून पंढरपूर स्टेशनवरून १६.३० वाजता सुटणार आहे. कुर्डूवाडी आगमन १७.३०, प्रस्थान १७.४०, जेऊर आगमन १८.१५, प्रस्थान १८.१७, भिगवण आगमन १९.०५, प्रस्थान १९.०७, दौंड आगमन २०.१०, प्रस्थान २०.२०, अहमदनगर आगमन २१.५५ प्रस्थान, प्रस्थान २२, बेलापूर आगमन २३, प्रस्थान २३.०३, कोपरगाव आगमन ००.१०, प्रस्थान ००.१३, मनमाड आगमन १.२०, प्रस्थान १.४५ व अमरावतीला १०.३० वाजता पोहोचणार आहे. या गाडीस १८ कोचेस असणार आहेत.
 

 


solapur pune pravasi sangatana