आषाढीला देवाची गाडी नाही

05/07/2010 13:02

 

वारकऱ्यांना पुन्हा हुलकावणी
यंदाच्या आषाढीला देवाची गाडी नाही

गेली जवळजवळ ८१ वषेर् भागवत भक्तांना पांडुरंगाच्या भेटीला 'नॅरोगेज' रेल्वे मार्गावरून घेऊन जाणारी देवाच्या गाडीचा आता 'ब्रॉडगेज' वरून धावणार आहे.... रुंदीकरण झालेल्या या मिरज-पंढरपूर मार्गाचे १ जुलैला उद्घाटन केले जाण्याची शक्यता होती, पण सध्या काही कामे पूर्ण न झाल्याने तो कार्यक्रम घडू शकला नाही.... आणि ही आषाढी वारी नव्या गाडीतून होण्याची चिन्हेही आता मावळली आहेत.... थोडक्यात रेल्वेने वारकऱ्यांना पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे.

तसे पाहता, ही 'नॅरोगेज' रेल्वे लाईन ब्रिटिश राजवटीत -साधारणत: १९२७-२८ च्या सुमारास -बाशीर् लाईट रेल्वे कंपनीतफेर् - सुरू झाली. गोरगरीब जनतेला पंढरपूरला जाण्यासाठी ही गाडी अत्यंत सोयीची होती. प्रतिवषीर् आषाढी व कातिर्की एकादशीला हजारोच्या संख्येने भाविक या गाडीने पंढरपूरला जात. संथगतीने जाणारी ही गाडी बहुतेक सर्व स्टेशनवर विश्रांती घ्यायची. पण स्वातंत्र्यानंतरही अशा या -देवाच्या गाडीकडे- फारसे कुणी लक्ष दिले नाही. ती दुर्लक्षितच राहिली.

तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा हे एकदा पंढरपूरला -पांडुरंगाच्या भेटीला आले होते, त्यांना त्यावेळी या 'ब्रॉडगेज मार्गाचे' महत्त्व पटले आणि त्यांनी या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला.

२००१ मध्ये पंढरपूर-कुर्डुवाडी पहिला टप्पा पूर्ण झाला. त्यामुळेच मिरज-लातूर या ३४७ कि.मी. नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू झाले. मिरज-पंढरपूर १३७ कि. मी. चे काम मात्र प्रथमपासूनच आस्ते... आस्ते... जणू 'गोगलगाईच्या' गतीने चालू राहिले.

आता पुन्हा ब्रॉडगेज रेल्वेतून प्रवास करण्याची वारकऱ्यांची संधी हुकली आहे, कारण प्रशासन म्हणते काही कामे बाकी आहेत. सध्या 'नॅरोगेज' देवाची गाडी पूर्णपणे इतिहास जमा झाली आहे.....वारकरी वाट पहात आहेत ती 'ब्रॉडगेज' मार्गाची...


solapur pune pravasi sangatana