कोकण रेल्वे पुन्हा ठप्प

02/09/2011 17:06

शुक्रवारी सकाळी पोमेंडीजवळ रुळावर माती आणि चिखलाचे ढिगारे पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली. यामुळे अनेक रेल्वेगाड्या ठिकठिकाणी थांबवाव्या लागल्या असून मुंबईतून कोकणात जाणा-या प्रवाशांना पुन्हा अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कोकणात पडणा-या संततधार पावसामुळे रेल्वे रुळालगतच्या डोंगरावरची माती खचून खाली पडण्याचे प्रकार सुरु आहे. रेल्वे रुळांवर माती आणि पाणी पडत असल्याने मोठा चिखल होतोय. परिणामी रुळ झाकले जात आहेत. सोमवारी गौरीच्या आगमनासाठी अनेक चाकरमानी कोकणात जात आहेत. त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दोनच दिवसांपूर्वी पोमेंडीजवळ संरक्षक भिंत कोसळल्याने रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प होती. यामुळे गणेशोत्सवसाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांचा खोळंबा झाला होता.
 


solapur pune pravasi sangatana