हुतात्मा एक्स्प्रेसवर दरोडा

20/01/2012 12:58
सोलापूर। दि. 19 (प्रतिनिधी)
              करमाळा तालुक्यातील केम येथे गुरुवारी रात्री हुतात्मा एक्स्प्रेसवर दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी दगडफेक केल्याने दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले.
             हुतात्मा एक्स्प्रेस पुण्याहून सोलापूरकडे येत होती. रात्री 9 वा. गाडी केमजवळ आल्यावर क्रॉसिंगसाठी थांबली. ही संधी साधून आठ ते दहा दरोडेखोरांनी डब्यांवर चाल केली. उघडय़ा खिडक्यांमधून हात घालून प्रवाशांच्या अंगावरील दागिने लुबाडण्याचा प्रयत्न झाला. यामुळे प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केल्यावर दरोडेखोरांनी दहशत बसविण्यासाठी दगडफेक सुरू केली. यातील पाच ते सहा सशस्त्र दरोडेखोरांनी डी 9 या डब्यात घुसण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांनी प्रतिकार केल्यावर दरोडेखोर पळाले. यामुळे सुमारे अर्धा तास गोंधळ सुरू होता. गाडीच्या पहिल्या आणि शेवटच्या डब्यात गार्ड होते. गोंधळ झाल्याठिकाणी पोलीस पोहोचेर्पयत दरोडेखोर पसार झाले.
दरोडय़ाच्या प्रयत्नामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. रात्री साडेनऊ वाजता गाडी
कुर्डुवाडीच्या दिशेने निघाली. कुर्डुवाडी स्थानकावर गाडी पोहोचल्यावर प्रवाशांनी गोंधळ केला.सोलापुर पुणे प्रवासी संघटनाचे अध्यक्ष- श्री संजयदादा टोणपे यांनी त्यांची समजूत घालून गाडी मार्गी लावली. फिर्याद नोंदविण्यासाठी दोन पोलीस गाडीत आले. या गोंधळामुळे 20 मिनिटे कुर्डुवाडी स्थानकावर गाडी थांबली होती.
या घटनेमुळे गाडी सोलापूरला पोहोचण्यास एक तास विलंब झाला. तसेच या वेळेत या मार्गावरून धावणा:या गाडय़ांच्या वेळेवर परिणाम झाला.
कुर्डुवाडी ते केमदरम्यान अशा घटना सतत घडत असतानाही खबरदारी घेण्यात येत नसल्याबद्दल प्रवासीनी चिंता व्यक्त केली.

solapur pune pravasi sangatana