रेल्वे प्रवाशांना ओळखपत्र बंधनकारक

20/03/2012 16:02
नवी दिल्ली, ता. १८ - तिकिटाचा गैरवापर होण्याच्या घटनांमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने वातानुकुलित प्रथम श्रेणीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ओळखपत्र बंधनकारक केले आहे.

तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच ओळखपत्र बाळगणे बंधनकारक केले आहे.

15 फेब्रुवारीपासून हा निर्णय अमलात आणला जाईल, असे रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. एकत्रित प्रवास करणाऱ्यांमधील कोणत्याही एका प्रवाशाकडे ओळखपत्र असणे आवश्‍यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ओळखपत्र म्हणून मतदार कार्ड, पॅनकार्ड, पारपत्र, वाहन परवाना, राष्ट्रीयकृत बॅंकेचे पासबुक (छायाचित्र असलेले), क्रेडिट कार्ड, छायाचित्र असलेले विद्यार्थी ओळखपत्र, किंवा आधारकार्ड ही कागदपत्रे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जातील, असेही सूत्रांनी सांगितले.

दलालांचे वाढते प्रमाणे, काळा बाजार, हस्तांतरण या तिकिटाच्या गैरवापरामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

2008-09 मध्ये तिकीट हस्तांतराची 20, 240 प्रकरणे समोर आली. त्यातील 2, 521 जणांना ताब्यात घेण्यात आले. तर, 2010-11 मध्ये 63, 854 प्रकरणे झाली. त्यातील केवळ 2, 480 जणांना पकडले गेले.

solapur pune pravasi sangatana